*श्री स्वामी समर्थ* *नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???*
*नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???* *श्री स्वामी समर्थ* निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. *श्री स्वामी समर्थ* सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात. *श्री स्वामी समर्थ* काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. *श्री स्वामी समर्थ* शांत झोप लागते.वेळेवर जागही येते. *श्री स्वामी समर्थ* पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. *श्री स्वामी समर्थ* स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक ...