दारिद्र्य श्री स्वामी समर्थ गुरुकृपेने गेले !
श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र Shri swami samarth seva math / kendra Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध - नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup श्रीगुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले. कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिणकाशी असे म्हणतात. श्रीगुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण रहात होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने रहात असे. दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल, त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळया हाती परत पाठवत नसे. भिक्षान्न, अतिथीसेवा आणि ईश्वराचे भजन यांत ते मोठ्या सुखात होते. एकदा श्रीगुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरुंना आसन दिले. त्यांची पूजा केल...